Health insurance update आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्वांना मिळणार पाच लाखाची विम्याची कार्ड.

Health insurance update नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रति वर्षी प्रती कुटुंब पाच लाख रुपये महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय राज्य सरकारने 28 जून 2023 रोजी घेण्यात आला आहे पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा मिळणार आहे तसेच त्यासाठी कार्डवाटप लवकरच सुरू करण्यात येणार आहे राज्यातील संपूर्ण नागरिकाला मिळणार जन आरोग्याचे कवच तसेच आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब दीड लाख रुपया वरून आता पाच लाख रुपये करण्यात आलेले आहे अशीच संपूर्ण माहिती आज आपण आपल्या या बातमीमध्ये पाहणार आहोत.

Health insurance update मित्रांनो दरवर्षी प्रत्येक नागरिकाला प्रति कुटुंब दीड लाखाचा आरोग्य विमा मिळत होता पण हा लाभ केसरी रेशन कार्डधारकांना आणि अंतोदय रेशन कार्डधारकांना मिळत होता, महात्मा फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना मिळणार आहे.तसेच शासनाने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना दोन्ही एकत्र करण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना दीड लाख मिळत होते पण आता पाच लाखाचां विमा कवच मिळणार आहे पण आता या दोन्ही योजनांचे एकच कार्ड वाटप करण्यात येणार आहे.

सिबिल स्कोर चेक करा येथे क्लिक करा

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार घेता येणार आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना मध्ये 996 तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मध्ये बाराशे नऊ उपचार आहेत तसेच दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या १३५६ एवढी करण्यात आलेली आहे महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही एकत्रित योजनांमध्ये अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1000 एवढी आहे.

अशी करा आपल्या कुटुंबातील वडिलोपार्जित जमीन नावावर, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

तसेच मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण अडीच लाख एवढी आहे ती आता चार लाख 50 हजार एवढी करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.

Health insurance update महात्मा फुले आरोग्य योजना ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यात 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रुग्णालय अधिकृत करण्यात निर्णय झाला आहे या व्यतिरिक्त 200 रुग्णालय अधिकृत करण्यास मान्यता देण्यात आलेले आहे.

तसेच बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचाराची संख्या 74 वरून 184 वाढविण्यात आली आहे उपचाराच्या खर्च मर्यादेत तीस हजार रुपयांवरून प्रति रुग्ण प्रति अपघात एक लाख रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे म्हणून यामध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो या दोन्ही योजनांचे कार्ड वाटप लवकरच सुरू करण्यात येणार आहे तर संपूर्ण राज्यातील नागरिकाला याचा लाभ घेता येणार आहे धन्यवाद.

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada