Medical free check update

Medical free check update मित्रांनो ज्येष्ठ नागरिकाचे वर्षातून दोन वेळा आरोग्य चाचणी शासनातर्फे मोफत केली जाणार आहे. तसेच यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून पत्र देखील जारी करण्यात आलेला आहे काय आहे ते पत्रक आणि त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा जारी केल्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

ज्येष्ठ नागरिकाच्या प्रलंबित मागणीवर साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकाला वर्षातून दोन वेळा आरोग्य चाचणी किंवा तपासणी शासनामार्फत करण्याबाबत इतर या विषयाबाबत दिनांक 17 मे 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्या त्या विभागांना निर्देश देण्यात आले आहेत.

असे मिळवा आठ दिवसात ड्राइविंग लायसन घरपोच, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

तसेच राज्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय राज्य कामगार विमा तसेच महानगरपालिका सर्व रुग्णालय यांच्यामार्फत सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा आरोग्य चाचणी करून यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आबा कार्ड देण्यात येऊन त्यांना सुपर स्पेशलिस्ट दवाखान्यात सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तपासणी अंतर्गत काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले योजना मोफत उपचार मिळावे यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनांमध्ये अटी व शर्ती मध्ये सर्व ज्येष्ठांना मोफत करण्यात यावे. आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटी पन्नास लाखा पर्यंत आहे तर ही सुविधा पुरवायची असेल तर ज्येष्ठ नागरिकाच्या तपासणीसाठी डॉक्टर व संबंधित चाचणी तपासण्याकरिता आठवड्यातील दोन दिवस राखीव ठेवण्यात यावेत.

आपल्या कुटुंबातील वडिलोपार्जित शेतजमीन अशी करा नावावर त्यासाठी येथे क्लिक करा

Medical free check update ज्येष्ठ नागरिका वरील सध्याच्या होत असल्यालेल्या कौटुंबिक सामाजिक अत्याचार लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकाच्या सुरक्षासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापना करावेत. तसेच
ज्येष्ठ नागरिक धोरणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जेष्ठ साठी आयुक्त स्तरावर स्वतंत्र आयुक्तालय निर्मिती करण्यासाठी कारवाई करण्यात यावी! ज्येष्ठ नागरिक धोरणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे शासनाने सन 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरंगुळा केंद्राची घोषणा केली आहे परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही तसेच त्या संबंधित विभागाला आदेश देण्यात यावी धन्यवाद.

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada