Goat cow farming शेळी मेंढी गाय वाटप योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज आणि किती मिळते अनुदान संपूर्ण माहिती.

Goat cow farming नमस्कार शेतकरी मित्रहो तुम्हाला शेळी मेंढी गट वाटप योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर खालील संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.पशु संवर्धन विभागाच्या वतीने दुधाळ गाई म्हशी वाटप, शेळी मेंढी गट वाटप करणे व 1000 मांसल कुक्कुट पक्षी वाटप करणे इत्यादी शासकीय योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत.

ज्या शेतकरी बांधवाना शेळी मेंढी गाई म्हशी व क्क्कुट पालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी दिनांक ८ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करून द्यावेत.गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुटपालन या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. हा अर्ज सादर कसा करावा लागतो या संदर्भात या लेखामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

Goat cow farming योजनेसाठी मिळते अनुदान ऑनलाईन करावा लागेल अर्ज,ग्रामीण भागातील शेतकरी शेतीव्यवसाय करत असतांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन, दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन व्यवसाय करत असतात. शेळी पालन, कुक्कुटपालन व्यवसाय किंवा गाई म्हशी घेण्यासाठी शेतकरी बांधवांकडे आर्थिक भांडवल नसते.

अशावेळी शेतकरी बांधवानी नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केल्यास त्यांना शासकीय अनुदान मिळू शकते. यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळी गाई व कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यावर योजनेसाठी अर्ज करावा लागतो. तुमचा आधार नंबर युजरआयडी म्हणून वापरावा व नोंदणीकृत मोबाईलचे शेवटचे ६ अंक पासवर्ड म्हणून वापरावेत. लॉगीन केल्यावर अर्ज सादर करण्यास सुरुवात करावी.शेळी गाई म्हशी कुक्कुटपालन योजना 2023 सुरु तुमच्याकडे खालील कागदपत्रे असू द्या

1. आधार कार्ड.

2 चालू स्थितीतील मोबाईल नंबर.

3 राशन कार्ड.

4 राशन कार्डवर घरातील जेवढे सदस्य असतील त्या सर्वांचे आधार कार्ड.

5 बेरोजगार नोंदणी केली असेल तर त्याची पावती.

6 अपंग असाल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र.

7 अर्जदाराचा फोटो

8 स्वाक्षरी केलेला फोटो.

वरील सर्व कागदपत्रे आणि फोटो तयार ठेवा आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा जेणे करून अर्ज करतांना तुम्हाला अडथळा येणार नाही.

किती मिळेल अनुदान
दुधाळ जनावरे

संकरित गाई प्रकल्प किंमत

२ संकरित गाई घेतल्या तर एका गाईसाठी ७० हजार या प्रमाणे २ संकरित गाईसाठी १४०००० व ३ वर्षाचा विमा १६८५० एकूण १५६८५० रुपये प्रकल्प किंमत दुधाळ संकरित गाईसाठी गृहीत धरली जाते.

सोयाबीन बाजार भाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Help dada

Close Help dada